google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ॲड.अभिषेक कांबळे यांची जनसेवा संघटनेच्या राज्य प्रवक्ता पदी निवड.. धवलदादांसारख्या खमक्या नेतृत्वाची राज्यातील तरुणांना गरज:- ॲड.कांबळे

Breaking News

ॲड.अभिषेक कांबळे यांची जनसेवा संघटनेच्या राज्य प्रवक्ता पदी निवड.. धवलदादांसारख्या खमक्या नेतृत्वाची राज्यातील तरुणांना गरज:- ॲड.कांबळे

ॲड.अभिषेक कांबळे यांची जनसेवा संघटनेच्या राज्य प्रवक्ता पदी निवड.. धवलदादांसारख्या खमक्या नेतृत्वाची राज्यातील तरुणांना गरज:- ॲड.कांबळे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला / प्रतिनिधी रविवार २० जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदी ॲड.अभिषेक कांबळे यांची निवड करण्यात आली प्रतापगड अकलूज येथे आयोजित जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य

 कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कांबळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.    

   माजी मंत्री स्वर्गीय पप्पासाहेब अर्थात प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जनतेच्या हितासाठी व सेवेसाठी जनसेवा संघटनेची स्थापना केली

 या संघटनेचे रोपटे अकलूज माळशिरस तालुक्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये विस्तार होऊन जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवणारे एक राज्यव्यापी संघटन रुपी वटवृक्ष उभारले आहे.

    या संघटनेची स्थापना स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी......यावर्षी केली जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरामध्ये त्याचा विस्तार देखील केला तसेच गेल्या अनेक दशकांपासून "जीवात जीवनात असे तो जनसेवाच करू" 

हे ब्रीद वाक्य मनात बाळगून स्वर्गीय पप्पासाहेब यांनी जनसेवा संघटनेची देशभरामध्ये मोठी ओळख निर्माण केली त्यांच्या दुखद निधना नंतर या संघटनेची धुरा त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळली

 डॉ.धवलसिंह यांच्या निर्भीड व धाडसी स्वभावामुळे राज्यभरामधील तरुणाई चे ते आकर्षण ठरले त्यामुळे समाजकारण करण्याचा हेतू मनात बाळगणाऱ्या तरुणाईचा ते आकर्षण बनले त्यामुळे जनसेवा संघटनेत सामील होऊन 

काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची मांदियाळी त्यांच्याभोवती नेहमीच पाहायला मिळते धवलदादांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ॲड. अभिषेक कांबळे यांची ओळख असून सांगोला तालुक्यातील समाजकारण आणि राजकारण करत असताना

 शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय तसेच रस्त्यावरची लढाई लढणारे असे संघर्षवादी तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून अभिषेक कांबळे यांची ओळख आहे.

    त्यांच्या कामाची पद्धत तसेच जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी चे संघर्ष पाहून जनसेवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

चौकट:-

जनसेवा संघटनेचे विचार घराघरात पोहोचवणार:- नूतन राज्यप्रवक्ते ॲड.कांबळे.

माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जनतेची सेवा करण्यासाठी जनसेवा संघटना सुरू करून संपूर्ण राज्यामध्ये त्याचा विस्तार केला त्यांच्याच संस्काराचा पगडा असलेले तगडे

 नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राज्याच्या प्रवक्ते पदी काम करण्याची संधी दिल्याने संपूर्ण राज्यांमध्ये घराघरात जनसेवा संघटनेचे विचार पोहोचवणार असल्याचे यावेळी नूतन राज्य प्रवक्ते कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments