google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक... सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे चारचाकी कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : नाझरे येथील दोन युवक ठार

Breaking News

धक्कादायक... सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे चारचाकी कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : नाझरे येथील दोन युवक ठार

धक्कादायक... सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे चारचाकी


कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : नाझरे येथील दोन युवक ठार

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- वाटंबरे येथे चारचाकी कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : दोन ठार 

वाटंबरे /प्रतिनिधी : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती वाटंबरे मान नदीच्या नजदीक तुळजापूर आगाराच्या तुळजापूर कोल्हापूर एसटीचा व चार चाकी कारचा भीषण अपघात घडला 

या अपघातात कार मधील दोघेजण जागीच ठार झाले तसेच एसटीच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली इतर प्रवासी जखमी झाले. 

तुळजापूर आगाराची (एम एच २० बी एल 42 26) एसटी तुळजापूरहून कोल्हापूर कडे जात असताना वाटंबरे मान नदीच्या नजदीक भरगाव वेगाने नाझरे 

या ठिकाणाहून सांगोलकडे जाणाऱ्या कारने डिव्हायडेड तोडून विरुद्ध बाजूने येत असलेल्या एसटीला धडक दिली.

 यात कार मधील राहुल आयवळे, संदेश हेगडे (नाझरे) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा या अपघातात चक्का चूर झाला

 तसेच एसटी चालक मुकुंद गोरखपुरी गंभीर जखमी झाला तसेच प्रवासी पूजाबाई कारभारी वाघमारे व ईतर प्रवासी जखमी झाले . घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग पोलीस पीएसआय भिंगारदेव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना हटवून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. 

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र वेग व रस्त्यावरील गाडी नियंत्रण गमावल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments