सोलापूर जिल्ह्यातील घटना..काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण पैशासाठी मुलाने केला बापाचा खून..
बार्शी : बैल विकून आलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा काठीने व पोतराजाच्या वाकीने बेदम मारहाण करून
खून केल्याची घटना तालुक्यातील वानेवाडी येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उघडकीस आली.
घटनास्थळाची सपोनी दिलीप ढेरे यांनी पाहणी केली.
रावण सोपान खुरंगुळे (वय 70 रा. वाणेवाडी) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे असे बापाचा खून
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस पाटील राहूल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले.
पैसे न दिल्याने अनंतराव वडील रावण खुरंगुळे यांना रात्री काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण केली होती.
या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्यात याबाबत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत.
0 Comments