google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 इंग्रजी अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Breaking News

इंग्रजी अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

 इंग्रजी अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण


 कोळा(प्रतिनिधी) शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812

 सांगोला तालुक्यातील विद्यार्थी खूप गुणवत्ताधारक आहेत, त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी इथले शिक्षक अहोरात्र कष्ट घेत आहेत. असेच कार्य करीत राहिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत 

असे प्रतिपादन दिव्य मराठी कडून 50 एक्सलेंस ने सन्मानित व यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक मंडळाचे मुख्य सल्लागार श्री गणेश (भाऊ)करे -पाटील यांनी केले.

 सांगोला तालुक्यातील इंग्रजी अध्यापक मंडळाकडून आयोजित मार्च 2025 इयत्ता दहावी मध्ये प्रत्येक प्रशालेतून इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या,विद्यार्थी शिक्षक व पालक तसेच आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ 

सिंहगड कॅम्पस कमलापूर येथे रविवार दिनांक 29 6 2025 रोजी गणेश भाऊ करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी श्री गुरुनाथ मुचंडे माजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक मंडळ,

  श्री बाळकृष्ण लावंड विद्यमान अध्यक्ष सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक मंडळ, उपाध्यक्ष शशिकांत चंदनशिवे, कल्याणराव साळुंखे तसेच संजय नवले सिंहगड कॅम्पस डायरेक्टर कमलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवणे येथे कार्यरत सहशिक्षक श्री हेमंत रायगावकर, महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव येथे कार्यरत

  सहशिक्षक श्री संजय देवकते सर यांचा इंग्रजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त इंग्रजी शिक्षक श्री धायगुडे सर तसेच इंग्रजी शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती मिळाले 

बद्दल कु. परवीन बागवान व राजेंद्र कांचनकोटी यांचाही सन्मान करण्यातआला. सांगोला तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील इंग्रजी विषयात प्रथम आलेले विद्यार्थी पालक शिक्षक यांचा ट्रॉफी प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाचे कार्य अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे हे काम नेटाने पुढे नेण्याचे काम मंडळाचे अध्यक्ष श्री फिरोज आतार व सचिव श्री बाळासाहेब नवत्रे सर व सर्व संचालक करीत आहेत याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

श्री गुरुनाथ मुचंडे व बाळकृष्ण लावंड आजी-माजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक मंडळ यांच्या मनोगततून सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अध्यापक मंडळातील सर्व सदस्यांचे कौतुक केले.

 सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत श्री दीपक जाधव, परिचय संतोष बदडे व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सूर्यकांत कांबळे  यांनी केले आपल्या मनोगतातून श्री फिरोज आतार सर यांनी अध्यापक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सचिव श्री बाळासाहेब नवत्रे सर यांनी केले

 तर आभार प्रदर्शन श्री राजेंद्र कांचनकोटे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments