धक्कादायक ! घरासमोर खेळताना पाण्याने भरलेल्या हौदात २ वर्षीय निशांत पडला अन्...,
बराच वेळ घरचे कामात व्यस्त जत तालुक्यातील घटना...
तिपेहळ्ळी (ता. जत) येथे घराजवळ खेळत असताना पाणी साठ्यासाठी केलेल्या हौदात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. निशांत नीलेश शिंदे (वय २ वर्ष, रा.तिपेहळ्ळी)
असे त्याचे नाव असून शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची जत पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. महिन्याभरात ही दुसरी घटना घडली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेल्याने पाण्याने भरलेल्या हौदात तो पडला.
त्यावेळी घरातील पुरुष कामानिमित्त गावाबाहेर होते; तर महिला घरकामात व्यस्त होत्या. त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याची कोणालाही कल्पना आली नाही.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता, घराशेजारील हौदात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याला तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments