सांगोला तालुक्यातील निजामपूरचे नामकरण 'संत बाळूमामा नगर' करावे - मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : राज्य व केंद्र शासनाच्या नामांतर धोरणाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव 'संत बाळूमामा नगर' करण्याची मागणी सोलापूर येथील समाजसेविका
माया श्रावण लवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडेही पत्राद्वारे निवेदन दिले आहे.
लवटे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ऐतिहासिक काळात मोगल व निजाम सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता व धर्म विस्तारण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक
गावांना मनमानी पद्धतीने नावे दिली होती. आजही राज्यात अनेक गावांची नावे मोगलकालीन व निजामकालीन आहेत. सध्या राज्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
अहमदनगरचे अहिल्यानगर, इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर झाले असून, सांगोला तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायतीचे नावही आधीच 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर निजामपूर गावाचेही नामकरण 'संत बाळूमामा नगर' म्हणून करण्यात यावे, अशी मागणी लवटे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, 'राज्यात इतर गावांची नामांतरे झाली असताना निजामपूरचे नावही बदलून संत बाळूमामा यांच्या स्मृतीला योग्य असा सन्मान मिळावा.'
राज्य शासनाने यापूर्वी केलेल्या नामांतर निर्णयांचे स्वागत करत, 'छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, ईश्वरपूर यांसह छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे नामकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे राज्य शासनाने निजामपूरचे नामकरण 'संत बाळूमामा नगर' म्हणून करण्याचा सकारात्मक विचार करावा,' असेही लवटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
0 Comments