google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक! नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..

खळबळजनक! नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

घरगुती वादातून नवऱ्यानं बायकोची निर्घृण हत्या केली आहे. पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. नंतर मारहाणही केली. 

या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापुरात घडली आहे.

या घटनेची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी करत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गौराबाई नीलकंठ पाटील असे मृत महिलेचं नाव आहे. तर, नीलकंठ भीमराव पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. हे जोडपं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून, त्यांच्यातक क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.

‘तू शेतात न येणारी आज कशी आलीस’ असा जाब विचारत पतीनं पत्नीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली.

दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. तसेच मारहाणही केली. या मारहाणीत पीडित महिला रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

गौराबाई काही दिवस मुलाकडे राहत होत्या. गावाला जाणे येण्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच गौराबाई यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments