सांगोला - कडलास नाका –एसटी स्टँड येथील दुभाजकावर उपायोजना करा:–
अशोक कामटे संघटना अपघाताचे प्रमाण वाढले,दुभाजक असून अडचण, प्रशासन बेफिकीर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) वासूद चौक ते कडलास नाका रस्ता दुभाजक येथे उपाययोजना तात्काळ करावी या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे
उपकार्यकारी अभियंता यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
सांगोला शहरातील कडलास नाका ते वासूद चौक येथील रस्ता दुभाजकाची अनेक वर्षापासून दयनीय, दुरावस्था झाली आहे .
रात्रीच्या वेळेस हे दुभाजक वाहनधारकांना दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, या दुभाजकावर कोणतीही रिफ्लेक्टर नाहीत व उंची कमी असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत .
प्रसंगी वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहे, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग ,
नगरपरिषद सांगोला यांचे कडून या विभागाकडून ठिकाणी रिफ्लेक्टर, स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवून या दुभाजकाची उंची वाढवावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, सांगोला, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला यांनाही देण्यात आले आहेत. हे दुभाजक असून अडचण नसून खोळांबा अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या दुभाजकामध्ये दगड व कचऱ्यांचा ढीग साठत चालला आहे. किमान या दुभाजकामध्ये वृक्षारोपण तरी करावे त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे.
सदरचा रस्ता पीडब्ल्यूडी विभागाकडे असल्याने या परिसरात दुभाजकांमध्ये स्ट्रीटलाईट व इतर कामे करावयाची आहेत पण त्याकरिता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाहरकत दाखला मागितला आहे तो प्रलंबित आहे
मिळाल्यावर या दुभाजकावर सुशोभीकरण व स्ट्रीटलाईटची कामे सुरू करणार आहोत असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी अशोक कामटे संघटनेचे निवेदन देतेवेळी सांगितले.
सदरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने या दुभाजक मार्गावरिल दुरुस्ती व इतर कामे करताना अडचणी येत आहेत पण हा मार्ग लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाल्यानंतर तात्काळ
या दुभाजकाची समस्या व त्या अनुषंगाने दुरुस्तीची कार्यवाही करू असे बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक मुलगीर यांनी याप्रसंगी आश्वासन दिले. यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:–
प्रश्न असा आहे की जबाबदारी कोण स्वीकारणार..?
सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद सांगोला व राष्ट्रीय महामार्ग यापैकी कोण लक्ष देणार ? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
या दुभाजकामुळे होत असलेले दैनंदिन अपघात रोखण्याकरता संबंधित प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करून उपाययोजना कराव्यात व या दुभाजकामध्ये वृक्षारोपण करावे ,
या समस्येमुळे संबंधित विभाग किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी मागणी सांगोलावासियातून होत आहे.
निलकंठ शिंदे सर ,अध्यक्ष :–अशोक कामटे संघटना सांगोला
0 Comments