धक्कादायक.. सांगोल्याकडे दुचाकीवरून बाजार करायला निघालेला तरुण पिकअप धडकेत ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : बाजार आणण्यासाठी सांगोल्याकडे दुचाकीवरून निघालेल्या तरुणास दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री ९:४५ च्या सुमारास सांगोला-मेडशिंगी रोडवर झपके गादी कारखान्याजवळ हा अपघात झाला. सोमनाथ लक्ष्मण चोरमले (वय २९) असे मृताचे नाव आहे. याबाबत,
वडील लक्ष्मण चोरमले यांनी गुरुवारी फिर्याद दिली. पोलिसांनी ज्ञानेश्वर सुखदेव केदार (रा केदारवस्ती- खारवटवाडी ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. फिर्यादी लक्ष्मण चोरमले यांचा मृत मुलगा सोमनाथ मंगळवारी दुचाकीवरुन
(एम एच ४५/४९८४) बाजार आणण्यासाठी जुन्या मेडशिगी रोडने सांगोल्याकडे निघाला होता. त्याला दूध वाहतूक करणाऱ्या (एमएच ४५-एएफ-९६८७) पिकअपने धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला.
0 Comments