खळबळजनक...सांगोला तालुक्यात महुद येथे ७० वर्षीय शेतकऱ्यास तिघांनी केली मारहाण
सांगोला : शेतातील रस्त्यावरून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून संगनमताने शिवीगाळ दमदाटी करून ७० वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्यास जबर मारहाण करून त्याच्या खिशातील ४० हजार रुपयांची रोख रक्कम हातातील
महागड्या कंपनीचे घड्याळासह मोबाइल बळजबरीने काढून घेऊन गेले. ही घटना मंगळवार, दि.८ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत मधुकर नारायण देशमुख यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रामदास आलदर, गंगूबाई रामदास आलदर व बिरुदेव रामदास आलदर (सर्वजण रा. महूद, ता. सांगोला) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
0 Comments