सांगोला तालुक्यात मानसिक तणावाखाली १४ वर्षीय युवकाने केली आत्महत्या..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : मानसिक तणावाखाली येऊन एका सोळा वर्षीय युवकाने पत्र्याच्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रितेश लक्ष्मण कांबळे (वय १४) असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास आलेगाव (ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, मृत रितेशचे वडील लक्ष्मण कांबळे यांचे आजारपणात सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मुलगा रितेशनेही आत्महत्या केली.
रितेश हा इयत्ता १० वी शिकत होता; पण त्याला जमीन, स्वतःचे हक्काचे घर नव्हते. तसेच हलाखीच्या परिस्थितीमुळे तो मानसिक तणावाखाली होता.
गुरुवारी नातेवाईक वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला गेल्याची संधी साधून रितेशने रात्री सातच्या सुमारास घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला.
0 Comments