google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शक्तीपीठ महामार्ग बाधीत ‌शेतकऱ्यांच्या बाजुने शेतकरी कामगार पक्ष-- आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

Breaking News

शक्तीपीठ महामार्ग बाधीत ‌शेतकऱ्यांच्या बाजुने शेतकरी कामगार पक्ष-- आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

शक्तीपीठ महामार्ग बाधीत ‌शेतकऱ्यांच्या बाजुने शेतकरी कामगार पक्ष-- आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शक्तीपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या बाजुने शेतकरी कामगार पक्ष असुन बाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चालु असलेल्या आंदोलनामध्ये 

शेतकरी कामगार पक्षाची भुमीका महत्वाची आहे...शेतकरी कामगार पक्षाने कवठेमहांकाळ येथील पश्चीम महाराष्ट्र विभागीय  मेळाव्यात भाई जयंत पाटील ,

आमदार भाई डाॅ.बाबासाहेब  देशमुख ,भाई.बाळाराम पाटील ,भाई..संपतबापु पाटील‌ ,तसेच दिगंबर कांबळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजुने  एकमुखी ठराव करुन राज्य सरकारला पाठवलेला आहे.

  तसेच शेकापक्षाचे आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी 

शक्तीपीठ या मार्गाचा मुद्दा सभागृहात पुढुल प्रमाणे उपस्थित केला... महामार्गामुळे राज्यातील ५० हजार शेतकरी बाधीत होत आहेत..

या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असुन.यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांचे नुकसान होणार आहे.जर सरकारला  हा  महामार्ग विरोध असुनही काढायचा 

असेल तर...बाधीत शेतकऱ्यांना एकरी एकरी ४ कोटी रुपये नुकसान भरपाई इथेदेण्याची मागणी सांगोला विधानसभा मतदार संघाचे  लोकप्रिय आमदार डाॅ.भाई  बाबासाहेब देशमुख यांनी केलेली आहे....

   शक्ती पिठ महामार्गामुळे  बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहीजे...आपल्या सोलापुर‌ जिल्ह्यातुन गेलेल्या सुरत चेन्नई महामार्ग बाधीत शेतकऱ्यांना एका गुंठ्याला ६० हजार रुपये देण्याचा निर्णय

 या अगोदर झालेला आहे..मात्र या शक्तीपिठ बाधीत शेतकऱ्यांना मात्र एकरी ४ कोटी रुपये प्रमाणे मोबदला मिळावा...ही शेतकरी कामगार पक्षाची भावना व भुमीका आहे ...

शेकापक्षाला या विषयात राजकारण करायचे गरज नाही. मी व आमचा शेतकरी कामगार पक्ष  कायम शेतकरी, कष्टकरी, कामगार ,दलीत ,वंचीत घटकांच्या सोबत आहोत 

 असे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments