google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार बाबासाहेबांच्या रुपाने‌‌ विधानभवनात स्व.आमदार आबासाहेब पहायला मिळाले--भाई‌ चंद्रकांत सरतापे

Breaking News

आमदार बाबासाहेबांच्या रुपाने‌‌ विधानभवनात स्व.आमदार आबासाहेब पहायला मिळाले--भाई‌ चंद्रकांत सरतापे

आमदार बाबासाहेबांच्या रुपाने‌‌ विधानभवनात


स्व.आमदार आबासाहेब पहायला मिळाले--भाई‌ चंद्रकांत सरतापे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक श्रेयश साठे ९५०३४८७८१२)

 विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आसुन या अधिवेशनाचा कार्यकाल तीन आठवड्याचा ठरवण्यात आला होता.३० जुन रोजी सुरु झालेले पावसाळी अधिवेशन १८ जुलै‌ रोजी संपले..

या अधिवेशनात महत्त्वपुर्ण आसे जनसुरक्षा विधेयक संमत करण्यात आले...तसेच एक,दोन ,तिन चार व पाच गुंठे जमीनीची खरेदी- विक्री करता येणार हा ही निर्णय घेण्यात आला.या  दोन गोष्टी वगळता.... हे पावसाळी अधिवेशन काहीसे वादगृस्तच ठरले आहे.

   सभाग‌हाच्या कामकाजामध्ये भाग घेणारे मंत्री व आमदार हे वैयक्तीक हेवेदावे असल्यासारखे आप- आपसात  वागत असल्यासारखे दिसले..एकमेकांना टोमणे मारणे, उगीचच दुसऱ्यावर हासणे,विक्षीप्त आवाज काढणे , सभागृहात आरे तुरे ची भाषा करणे, असंसदीय

 शब्दांचा सर्रास वापर करणे, सभागृहाबाहेर एकमेकांना घासुन जाणे,उगीचच मोठ्या आवाजात बोलने...कॅंन्टीन मधील मारा-मारी. त्यात‌  कहर झाला तो सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीने.

  वरील सर्व घटना घडत असताना सांगोला  विधानसभेचे लोकप्रीय आमदार हे मात्र राज्यातील व मतदार संघातील प्रश्न‌ सभागृहात मांडत असताना

 दिसले. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला तसेच शक्ती पिठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,छावणी 

चालकांच्या थकीत बिलाबाबत,अन्नसुरक्षा योजनेपासुन वंचीत असलेल्या  लाभार्थ्यांना लाभ मिळणे बाबत, सांगोला शहरातील झोपडपट्टी बाबत,सांगोला शहरातील ट्रामा सेंटर सुरु करण्याबाबत,

  शिक्षकांच्या प्रश्नावर,आरोग्य विभागातील  कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर,अंगवनवाडी सेवीकेंच्या प्रश्नावर, उपजिल्हा रुग्णालयाबाबत,प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत , माण व कोरडा नदीला कॅनोलचा  दर्जा देण्याबात ,

 फळबागांच्या‌ अनुदानाबाबत,अवकाळीपालसाने  झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन अर्थीक मदत देण्याबाबत , दिव्यांगाच्या अर्थीक अनुदानाबाबत,संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्याबाबत,कर्ज देताना 

सिबील ची अट शिथील करणेबाबत, पालखी मार्गाबाबत,नॅशनल हायवेवरील (ब्रिज)पुलाबाबत, नियमबांह्य शाळा प्रवेशाबाबत,सांगोला शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत तसेच लाॅर्ड बुध्दा ईनव्हरसीटी बाबत,

आसे अनेक प्रश्न सभागृहामध्ये आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या अधिवेशना दरम्यान  उपस्थित केले.त्या अनुषंगाने संमंधीत मंत्र्यांनी आमदार साहेबांनी  उपस्थित केलेल्या  प्रश्नांवर  सकारात्मक उत्तर द्यावे लागले..

  चालु वर्षाचे पावसाळी अधिवेशन नको-त्या वादग्रस्त मुद्द्यानेच भरपुर  गाजले...मात्र  सांगोला विधानसभा मतदार संघाचे  आमदार हे जनतेच्या विविध  प्रश्नावर सभागृहात आवाज उठवताना पहावयास मिळाले.गरज नसलेल्या मुद्द्यांना  स्पर्श न करता 

आपण जनतेच्या हिताचे  प्रश्न मांडण्यासाठी व त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी जनतेनी आपल्याला निवडुन दिलेले  आहे. याची जाणीव सतत मनामध्ये ठेवुन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात कामकाजामध्ये भाग घेतला.

   स्व आ.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांना आकरा वेळा आमदार म्हणुन जनतेने निवडुन दिले होते... आबासाहेब हे  सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेताना 

संपुर्ण सभागृह स्तब्ध होत आसे.त्यांनी सभागृहात कधीही गोंधळ,गलका आरडा-ओरड केला नाही.सभागृहामध्ये आक्रस्ताळी पणा कधीच केला‌ नाही. फक्त जनतेचे प्रश्न सनदशीर मार्गाने वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातुन  सभागृहात 

मांडुन सरकारला ते सोडवण्यास भाग पाडत असत.आबासाहेब कधीही  कोणाशी आकसाने वागले  नाहीत.तसेच आमदार बाबासाहेब देशमुख सुध्दा आकस न ठेवता इतरांशी वागताना दिसत आहेत.

आबासाहेबांचे सगळ्याच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संमंध होते त्या प्रमाणेच आमदार बाबासाहेब देशमुखांचे  सुध्दा सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संमंध आहेत.आबासाहेब हे चाकोरीबद्ध व्यक्तीमत्व होते.

आमदार बाबासाहेब देशमुख यांचे सुध्दा वर्तन, राहणीमान स्व.आबासाहेबां प्रमाणेच पहावयास मिळत आहे. सभागृहाभध्ये आबासाहेबा प्रमाणेच आभ्यासुपणे जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याची आमदार बाबासाहेबांची  पध्दती...

तसेच आपण जनतेचे सेवक आहोत वेगळे आसे काही नाही ही आमदार बाबासाहेबांची  भावना पहाता... खरच आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने संपुर्ण राज्याला सभागृहात आबासाहेब पहावयास मिळाले.....

Post a Comment

0 Comments