सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी ३.३० लाखांच्या चोरीच्या शेळ्यांसह २४ तासात आरोपी जेरबंद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/करण मोरे सांगोला पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत केवळ २४ तासांच्या आत चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ३.३० लाखांचा मुद्देमाल
(शेळ्या) हस्तगत करत आरोपीला अटक केली. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे.
ही घटना दि. १८ जुलै २०२५ रोजी सांगोला तालुक्यातील आचकदाणी येथे घडली. येथील सलिम दादा मुजावर यांनी
सांगोला पोलीस ठाण्यात १५ जुलै २०२५ रोजी मजूर मो. नजिर शेख (रा. बिहार) याच्यावर शेळ्या चोरी केल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दिली होती.
आरोपी शेळ्यांना चारा चारण्यासाठी शेडमधून घेऊन गेला मात्र संध्याकाळी परत न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने त्यानेच चोरी केल्याचा ठाम संशय फिर्यादीस आला.
त्यानुसार १६ जुलै रोजी रात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला (गुन्हा क्र. ५८२/२०२५). गुन्हा दाखल होताच सांगोला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत
सायबर शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आणि चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
-मोठ्या वयाच्या काळ्या, पांढऱ्या व लाल रंगाच्या शेळ्या - ३,००,०००/-, पाच काळ्या व पांढऱ्या रंगाची पाटरं - १५,०००/-, एक पांढऱ्या रंगाचा बोकड १५,०००/-, एकूण रक्कम - ३,३०,०००/- हा सर्व मुद्देमाल चोरीस गेला होता.
या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई केली.
कारवाईत पो. हवा. बिपिनचंद्र ढेरे, पो. हवा. नवनाथ माने, पो.शि. शहाजहान शेख, सायबर शाखाः पो. हवा. जुबेर तांबोळी. आदींसह अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.
सांगोला पोलिसांची ही तत्पर, तांत्रिक व कौशल्यपूर्ण कारवाई नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली असून, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम यशस्वी ठरली आहे.
0 Comments