धक्कादायक प्रकार..सांगोला येथे परप्रांतीयाची शर्टाने छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : अज्ञात कारणावरून परप्रांतीय कामगाराने राहत्या खोलीत शर्टाने छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, २२ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
तारिक जाकीर शेख (वय २०, रा. राजमहल, झारखंड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या परप्रांतीयाचे नाव आहे.
उमर खाटीक (रा. कचेरी रोड) यांचे सांगोला येथे चिकनचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात तारिक शेख दोन वर्षांपासून कामासाठी होता. २१ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उमर खाटीक व तारिक शेख दोघांनी दुकान बंद केले.
उमर हे त्यांच्या घरी गेले. तारिक शेख दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उमर यांनी तारिकला खाली बोलावले असता, तो खाली दुकानात आला नाही.
उमर यांनी वर जाऊन पाहिले असता, तारिकने शर्टन फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत उमर खाटीक यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.
0 Comments