मोठी बातमी..सांगोल्यात सात हजार लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू मिळणार
तहसीलदार मा.संतोष कणसे : ४०७ लाभार्थ्यांना ८१४ ब्रास वाळू वितरण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पंतप्रधान आवास योजनेतून
सर्वासाठी घरे या योजनेतंर्गत महसूल विभागामार्फत आतापर्यंत सांगोला तालुक्यातील ४०७ मोफत घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रासप्रमाणे ८१४ ब्रास मोफत वाळूचे वितरण केले आहे.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाइन पद्धतीने पासेस वाटप करण्यात येत असून त्यानुसार नियोजित डेपोमधून वाळूचे मोफत वितरण सुरू असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजना-२०२२ सर्वांसाठी घरे या योजनेतंर्गत सांगोला तालुक्यात ७ हजार ३३१ लाभार्थ्यांना मोफत घरकुले मंजूर झाली आहेत.
लाभार्थ्यांची संख्या
सांगोला तालुक्यात आतापर्यंत सांगोला-५०, शिरभावी-२५, हलदहिवडी-३२, संगेवाडी-५२, देवळे-३३, वाणीचिंचाळे-२१, चिंचोली-३७, शिवणे-५४, अजनाळे-४५,
लोणविरे -२५, भोपसेवावाडी-२१, गौडवाडी-१३, करांडेवाडी-३, बुद्धेहाळ-३, हटकर मंगेवाडी-१८ अशा एकूण ४०७लाभार्थ्यांना ८१४ ब्रास मोफत वाळूचे वितरण केले आहे.
घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांची होती. त्यानुसार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडून ३० एप्रिल २०२५ रोजी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयाची सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगोला तालुक्यातील सांगोला, मेडशिंगी, सरगरवाडी, गळवेवाडी हातिद व मांजरी अशा सहा ठिकाणी वाळूचे डेपो तयार केले आहेत.
सांगोला पंचायत समिती गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांचेकडून तालुक्यातील ७,३३१ घरकुल लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे.
मोफत वाळू वितरणासाठी सांगोला तालुक्यातील सहा ठिकाणी डेपो तयार केले आहेत. सदर वाळू डेपोवर मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, महसूल सेवक यांच्या पथकामार्फत मोफत वाळू वितरण केले जाणार आहे.
संतोष कणसे, तहसीलदार सांगोला
0 Comments