google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या - सुनील कर्जतकर सांगोल्यात भाजपच्या वतीने बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद कार्यक्रम संपन्न

Breaking News

नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या - सुनील कर्जतकर सांगोल्यात भाजपच्या वतीने बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद कार्यक्रम संपन्न

नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या -


सुनील कर्जतकर सांगोल्यात भाजपच्या वतीने बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद कार्यक्रम संपन्न

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या त्रिसूत्रीवर भाजपचे काम सुरू आहे. 

राजकारणातील गणिते नेहमी बदलत असल्याने भारतीय जनता पक्ष सत्तेत असून आपल्या सर्वांच्या पाठीमागे नरेंद्र मोदी नावाचे गुडविल आहे.

 देशाच्या विकासाची दूरदृष्टी असलेला नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता भारताला मिळाला आहे. २०४७ साली जगातील सर्वोत्कृष्ट देश करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 

गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी सांगितले 

        पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारच्या कारकिर्दीची यशस्वी अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या विषयावर समाजातील बुद्धिजीवी तसेच विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधण्यासाठी 

सांगोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर ग्रामीण पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद या कार्यक्रमाचे 

सांगोला शहरातील हॉटेल जोतिर्लिंग एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक ऐतिहासिक निर्णय व कामगिरीच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. 

           यावेळी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनधन योजना, सुकन्या

 योजना, आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, जलशक्ती मंत्रालयामार्फत सिंचन योजना, 

शेतीमालाला हमीभाव, पीक विमा योजना, घरकुल योजना, असंघटित कामगार योजना यासह गोरगरीब कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या. श्रीरामभक्तांचे रामजन्म भूमीचे स्वप्न साकार केले.

 आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही ३७० कलम हटविले. रेल्वे, रस्ते, मेट्रोमध्ये आमूलाग्र बदल केले. नरेंद्र मोदी यांच्यात सरकार चालविण्याची धमक असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 

विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्ष पूर्ण झाली. मोदी सरकारच्या मागच्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे. 

जीडीपीची परिस्थिती चांगली आहे. कृषी व्यवसाय, उद्योग, औद्योगिकीकरण, विज्ञान, कला, क्रीडा सांस्कृतिक, परंपरा या सर्व क्षेत्रात मोदी सरकारनं विकासाचं काम केलेलं आहे. 

मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला दिला. म्हणून आज महाराष्ट्राचा विकास झालेला आहे. पायाभूत सुविधा यांचा विकास झाला असून महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं आगेकूच करत आहे.

 गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारनं सर्व समावेशक विकास केला आणि तळागाळातील वंचित घटकाला न्याय दिला, असे गौरवोद्गार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी काढले.

       या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, गणेश चिवटे, संभाजी आलदर, संदेश काकडे, शिवराज पुकळे, दत्तात्रय जाधव, 

करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, बार्शी शहर अध्यक्ष महावीर कदम, वैराग मंडल अध्यक्ष मदन दराडे,

 कुर्डुवाडी मंडल अध्यक्ष अविनाश गोरे, नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील, सांगोला दक्षिण मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, विजय बाबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments