google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील महूद परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.! एका महिलेसह पाच जणांना धारदार हत्यारांनी मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल..

Breaking News

सांगोला तालुक्यातील महूद परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.! एका महिलेसह पाच जणांना धारदार हत्यारांनी मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल..

सांगोला तालुक्यातील महूद परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.!


एका महिलेसह पाच जणांना धारदार हत्यारांनी मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी आमचे -घरातील गोष्टींमध्ये का पडता असे म्हणत सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने चिकमहूद येथील एकाच कुटुंबातील 

एका महिलेसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथा बुक्क्‌याने, काठीने तसेच तलव-ारी सारख्या धारदार हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार सांगोला पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत चिकमहूद येथील कमु महारनवर यांनी सांगोला पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार दि.८ रोजी त्यांची चुलत बहीण पूनम सरक हिचे सोबत तिचा

 दिर मयूर सरक व पुतण्या शुभम यांनी घरगुती कारणावरून वाद केला होता. त्यामध्ये मध्यस्थी करून दोघांना समजावून सांगितले. मात्र त्याच रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मयूर 

सरक, शुभम सरक (दोघे रा. चिकमहूद) यांचे बरोबर राजू सरगर, विजय सरगर (दोघे रा. जुनोनी) यांचेसह काही अनोळखी लोक शिवीगाळ करत घराजवळ आले. 

मयूर सरक याने आमचे घरा-तील गोष्टींमध्ये का पडता ? तुम्हाला बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी राजू सरगर याने त्याच्या हातातील धारदार तलवारी सारख्या हत्याराने कानावर मारले. 

तसेच शुभम सरक यांनी काठीने मारहाण केली. शिवाय विजय सरगर व मयूर सरक हे हातातील काठीने मारहाण करू लागले. त्यावेळी कमु महारनवर यांचा भाऊ अतुल महारनवर, 

तात्यासाहेब महारनवर भावजय पूनम महारनवर हे सोडविण्यासाठी आले असता त्यांना पण या लोकांनी काठीने तसेच धारदार हत्याराने मारहाण केली आहे. तसेच चुलत भाऊ प्रशांत महारनवर

 यालाही मयूर सरक, शुभम सरक, राजू सरगर, विजय सरगर व इतर काही अनोळखी लोकांनी काठीने मारहाण करून शिवीगाळ व दम दाटी केली आहे. या मारहाणीत कमु महारनवर याचे उजव्या कानास चार टाके पडले आहेत. 

तर भाऊ अतुल महारनवर, चुलत भाऊ प्रशांत महारनवर या दोघांचे डावे हात मनगटा मागे पॅक्चर झाला आहेत. तसेच तात्यासाहेब महारनवर, पूनम महारनवर यांनाही मारहाण करण्यात आले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे..

चौकट -

पी आय साहेब चांगलेच मात्र महूद बिट अंमलदाराने वेशीवर टांगले : अॅड. अभिषेक कांबळे.

सांगोला पोलीस ठाण्यात पदभार स्विकारताच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणारे पोलीस निरीक्षक विन-ोद घुगे यांची ओळख आहे. श्री. घुगे यांच्या कामाची पद्धत पाहता 

सांगोला तालुक्यात जनमाणसांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत मोठी विश्वासार्हता निम णि होत आहेच, मात्र तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या महूद बीट अंतर्गत हद्दीमध्ये वारंवार गंभीर गुन्हे घडत

 असुन बिट अंमलदार यांच्या अनुपस्थित व निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यामुळे महूद बिटला उपस्थित राहणाऱ्या खमक्या अधिकाऱ्याची गरज असून याबाबत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी लक्ष घालावे.

Post a Comment

0 Comments