google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..कोळा गावातील अतिक्रमण विषय मोहीमेला ब्रेक नको..!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..कोळा गावातील अतिक्रमण विषय मोहीमेला ब्रेक नको..!

ब्रेकिंग न्यूज..कोळा गावातील अतिक्रमण विषय मोहीमेला ब्रेक नको..!


शब्दरेखा एक्सप्रेस/ कोळे प्रतिनिधी. सिंघम स्टाईलने गेल्या आठवड्यात घुगे साहेब व त्यांच्या टिमने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती.

कुरूप,विद्रुप झालेल्या कोळा गावच्या मुख्य बाजारपेठने चांगला श्वास घेण्यास सुरुवात केली.

घुगे साहेब व कोळा ग्रामपंचायतीचे कौतुक समस्त कोळा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लाखो लोकांनी तोंडभरून कौतुक केले.मुख्य बाजारपेठेतून फिरताना बाहेरच्या गावच्या लोकांच्या मनात जे भितीचे वातावरण होते..

ते कमी झालेले पाहायला मिळत आहे.लोकातून समाधान व्यक्त केले जात आहे.राजकीय पक्षाने व नेत्याने अतिक्रमण हटविण्यासाठी संपूर्ण पाठिंबा दर्शविल्याने संपूर्ण गाव पहिल्यांदा समाधानी व सर्वाचे कौतुक करताना दिसत आहे.

       पण लोकांच्या मनात एक वारंवार लस टोचत आहे.शासकिय नियमानुसार कोळा गावातील अतिक्रमण कधी निघणार... राजकीय पक्ष, घुगे साहेब व त्यांची टिम तसेच ग्रामपंचायत काही लोकांना पाठीशी घालत आहेत..अशी लोकांमध्ये चौका - चौकात चर्चा सुरू आहे.

   शासकीय नियमानुसार अतिक्रमण न हटविण्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.हे काम लवकरात लवकर ग्रामपंचायत व घुगे साहेबांच्या टीमने करावे ...अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

कित्येक वर्षे अतिक्रमणामुळे कोळा गावच्या मुख्य पेठेत वाहनचालक व लोकांमध्ये बाचाबाची व मारहाण होण्यापर्यंत प्रकरणे गेले होती.या पंधरा दिवसांत खूप शांतता पाहायला मिळत आहे.

   शासकीय धोरणे व PWD च्या धोरणानुसार अतिक्रमण हटविण्याची मागणी कोळा गावातून जोर धरू लागली आहे.

कोणी हे अतिक्रमण हटविण्यास अडथळा आणला तर त्या विरोधात कडक भूमिका ग्रामपंचायत व प्रशासनाने घ्यावी. अतिक्रमणामुळे गुदमरलेल्या गावाला मोकळा श्वास घेऊ द्या...

अशी लोकांमध्ये वारंवार चर्चा होत आहे. मुख्य रस्त्यावर रोड लाईट, लोकांना शौचालयाची योग्य सुविधा, तसेच गावाच्या सुरक्षिततेसाठी मुख्य चौकामध्ये सीसीटीव्ही लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

     गावातील सर्व  नागरिकांनी ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहून सहकार्य करावे.

 गावाची लोकसंख्या वाढत आहे. चार चाकी, दोन चाकी ची पार्किंग समस्या आहे. या सर्व समस्यांचा पुढील अनेक वर्षांचा विचार करून गावाचा आराखडा तयार करावा व तो अमलात आणावा.

   गेली अनेक वर्ष सार्वजनिक जागेत व्यवसाय करणारे व्यावसायिकांनी कोणताही दबाव न आणता ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करावे. ग्रामपंचायतीने सदर जागेतील अतिक्रमण काढून गाळे बांधावेत व पहिल्या व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे.

     *( एक कोळा प्रेमी नागरिक..)*

Post a Comment

0 Comments