google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक..राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर तालुक्यातील घटना..

खळबळजनक..राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर तालुक्यातील घटना..


पंढरपूर:- सुखी संसारात एकदा का संशयाची जळती ठिणगी पडली, की ते नातं भंग पावते. 

पंढरपूर येथे घडलेली दुर्दैवी घटना याचेच जिवंत उदाहरण ठरली आहे. पतीने पत्नीवर संशय घेतला आणि रागाच्या भरात तिला मुलांसमोरच कुऱ्हाडीनेच संपवलं.

आईला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मुलांवरही संतापलेल्या बापाने हल्ला केला. ही घटना पहाटे लक्ष्मी टाकळी गावात घडली आहे. या घटनेने पंढरपूर हादरले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी येथे पती तानाजी उबाळे आणि पत्नी पल्लवी उबाळे दाम्पत्य राहते.

 पती तानाजी कायम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये कायम खटके उडायचे.

बुधवारी देखील पहाटे दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले त्यामुळे आई- वडिलांच्या भांडणाचा आवाज आल्याने

 दोघेही मुलं झोपेतून जागी झाली. भांडण इतकी विकोपाला गेली की पती तानाजीने रागात पल्लवीवर कुऱ्हाडीने वार केला.

पंढरपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

रागाच्या भरात वडिलांना आईवर वार करताना पाहिल्यानंतर वाचवण्यासाठी मुले धावली मात्र मुलांवर पतीने हल्ला केला.

हल्ला करताना झालेल्या झटापटीत तानाजी देखील जखमी झाला. दोन्ही मुलांवर पंढरपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

तानाजी उबाळेवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजीने पत्नीवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

या घटनेने मोठी खळबळ उडाली असून आरोपी तानाजी उबाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments