google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले 'हे' कारण

Breaking News

खळबळजनक..गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले 'हे' कारण

खळबळजनक..गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले 'हे' कारण


अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्लाय ९१ च्या गोवा फ्लाइटच्या वैमानिकांनी शुक्रवारी सजगता दाखवली. 

गोव्यावरून थेट आल्यानंतर विमानतळावर लैंडिंग न करता विमानतळ भोवतालच्या २० किलो मीटर परिघात तीन वेळा घिरट्या घातल्या.

त्याने प्रवाशांत घालमेल वाढली. मात्र, काहीही धोका नसल्याचे वैमानिकाने सांगताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वैमानिकाने घिरट्या घालून परिसरातील इमारती, झाडे, कारखान्यांच्या धुराड्यांचा अभ्यास केला. संपूर्ण निरीक्षण नोंदवून अर्ध्या तासानंतर विमान सोलापूर विमानतळावर उतरले.

फ्लाय ९१ चे विमान गोव्यावरून काल शुक्रवारी नियोजित वेळेत सोलापूरसाठी निघू शकले नाही. सकाळी ८.३० वाजता येणारे विमान अडीच तास उशिराने सोलापुरात पोहोचले. प्रतिकूल हवामानाचे कारण कंपनीने दिले.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केले. ते ११ वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचले. त्यानंतर विमानतळाच्या भोवताली असलेल्या कुंभारी, देड्डी, बक्षीहिप्परगे, सोरेगाव, हत्तुर या गावांच्या परिसरात विमानाने तीन घिरट्या घातल्या.

विमान हवेतच घिरट्या घालत असल्याने सोलापूरकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती. तासभर त्याचीच चर्चा सुरू होती. सुमारे अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर ते साडे अकराच्या सुमारास विमानतळावर लैंड झाले.

सोमवारी आणि शुक्रवारी गोव्यातून सकाळी ७.३० वाजता निघून सोलापुरात ८.३० वाजता पोहोचण्याची विमानाची वेळ आहे. पण शुक्रवारी उशीर झाला.

२० किमी परिघात वैमानिकांकडून विमानतळ भोवतालचे निरीक्षण

परिस्थितीचा आढावा घेतला

विमानसेवेच्या शुभारंभ दिवशी वैमानिकांना परिसराची पाहणी करता आली नव्हती. त्यामुळे वैमानिकांनी परिसरात तीन वेळा फेरी मारून विविध कारखान्यांची धुराडे आणि इमारतींचा अभ्यास केला.

 संपूर्ण निरीक्षण नोंदवल्यानंतर विमान विमानतळावर सुखरूपपणे लॅण्ड झाले.’ अंजनी शर्मा, व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ

अडीच तास तास उशिरा झाले

खराब हवामानामुळे गोव्यावरून सकाळी ८.३५ येणारे विमान सोलापूरला ११.१० वाजता म्हणजे अडीच तास उशिरा आले. काही महिला प्रवासी जाण्यासाठी गोव्याहून विमानाने आल्या.

 तर काही सोलापूरकर गोव्याहून परतले. शनिवारी विमान सायंकाळी ४.०५ वाजता गोव्याहून निघेल ५१० वाजता सोलापुरात येईल.

धावपट्टीपासून अपेक्षित उंचीचा वेध घेतला

सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर विमानतळावर लॅण्ड करण्यासाठी विमानाची धावपट्टीपासून उंची किती असावी, याचा अंदाज वैमानिकांनी घिरट्या घालताना बांधला. अपेक्षित योग्य उंची राखण्यासाठी वैमानिकांनी निरीक्षण केल्याचे सांगण्यात आले.

५१ प्रवाशांना घेऊन आले गोवाहून सोलापूरला

गेलेले फ्लाय ९१ चे IC 1402 हे विमान ५१ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी सकाळी सोलापूर विमानतळावर उतरले. सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे ढग कमी होते. कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि विमान सुरक्षितपणे उतरवले.

व्हिज्युअल सर्किट आणि गो-अराउंड अॅप्रोच घेत परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर हे करण्यात आले. आमचे कर्मचारी डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च प्रशिक्षित आहेत.

 नियमांचे पालन करतात. प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता आहे. पावसाळ्यात वारे, पाऊस आणि ढग कमी असल्याने हवामानाची परिस्थिती

 अनेकदा वेगाने बदलत असते. त्यामुळे खबरदारी घेण्यात आली.- मनोज चाको, सीईओ, फ्लाय ९१ एअरलाइन्स

Post a Comment

0 Comments