google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात मागील 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेले 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण रद्द ?१५ जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फर्मान ;

Breaking News

सांगोला तालुक्यात मागील 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेले 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण रद्द ?१५ जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फर्मान ;

 सांगोला तालुक्यात मागील 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेले 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण रद्द ? ;


१५ जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फर्मान

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंच यांच्या स्वप्नांना 'ब्रेक' ! आरक्षण पुन्हा नव्याने ठरणार ? 

सांगोला : सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. 

मात्र, नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागा कमी जास्त झाल्यामुळे शासनाकडून मागील दोन महिन्यापूर्वी जाहीर केलेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द केले आहे. 

१५ जुलैपर्यंत आरक्षण नव्याने सुनिश्चित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंच यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे.

     सांगोला तालुक्यातील एकूण 76  ग्रापंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 22 एप्रिल २०२५ मध्ये जाहीर करण्यात आले होते. जागा कोणाला सुटली?

 हे स्पष्ट झाल्याने गावगाड्यातील भावी सरपंच कामाला लागले होते. आपल्या वॉर्डासह संपूर्ण गावातील लहान-मोठी कामे जाणून घेत मतदारांना रामराम ठोकण्यास सुरुवात झाली होती. 

एवढेच नाही तर अनेकांनी जनसंपर्कही वाढविला होता. असे असतानाच शासनाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. परंतु आता नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्यात येणार आहे. 

यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना १५ जुलैपर्यंतची डेडलाइन देण्यात आल्याची माहिती आहे. लोकसंख्येचा विचार करून कोणत्या प्रवर्गासाठी किती सरपंचपद द्यावेत, याची आकडेवारीही आदेशासोबत जोडली आहे

 हे विशेष. एकूणच आता नव्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांच्या स्वप्नांना मात्र ब्रेक लागला आहे. त्यांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा आली आहे.

 नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील जागा कमी - जास्त झाल्यामुळे आरक्षण सोडती मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाच्या निर्णयानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार पुनश्च एकदा आरक्षण सोडत प्रक्रिया घेण्यात येईल.

 याबाबत निवडणूक विभागाकडून नागरिकांच्या माहितीस्तव प्रसिद्धीकरण करण्यात येईल. सध्या तरी वरिष्ठांकडून आरक्षण सोडतीबाबत कोणताही आदेश नाही. 

    मा. संतोष कणसे - तहसीलदार, सांगोला सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये  1 अनु जमाती राखीव महिला, 16 अनु जाती,  21 नाम प्र. 38 सर्वसाधारण असे आरक्षण जाहिर करण्यात आले. 

यामध्ये 39 ग्रामपंचायतीवर महिलाराज जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पुन्हा आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याने आरक्षण सोडत प्रक्रियेतून पुन्हा एकदा 'काही खुशी काही गम' अशी स्थिती झाली आहे.

Post a Comment

0 Comments