google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी

Breaking News

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी

 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी


सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर

सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे  आहेत  आषाढी वारीसाठी कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रातून दररोज हजारो  वारकरी  पायी चालत जातात 

व हजारो वाहने या रोडवरून जातात रस्त्यावरील जाणा येणाऱ्या वाहनांना अडचणी ठरणाऱ्या चिलारीची झाडे तात्काळ काढावीत अशी मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे

सांगोला पंढरपूर रस्ता हा 24 तास रहदारीचा रस्ता आहे रात्रंदिवस या रस्त्यावर वर्दळीचा आहे सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे उगवली आहेत 

ती झाडे मोठी झालेत वाऱ्याने रस्त्यावर येतात रहदारीला अडथळा होतो सध्या पंढरपूरला रस्त्याचे बाजूने 

आषाढी वारीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत जातात दुचाकी चारचाकी वाहने ही मोठ्या संख्येने जातात  पायी चालत जाणारे वारकरी यांना या चिलारीच्या झाडांमुळे त्रास सहन करावा लागत आहे 

 त्यामुळे आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही  बाजूची चिलार काढण्याची मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments