आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास 'या' मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा;
महसूल प्रशासनाने केले आवाहन प्रभारी तहसिलदार संतोष कणसे
मंगळवेढा तालुक्यात सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ ज्या कार्डधारकांचे उत्पन्न वाढले आहे
त्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांनी कार्डधारकांना केले आहे.
राज्यशासनाने गोरगरीब नागरिकांची परिस्थिती ओळखून न त्यांना १९९६ पासून रास्तभाव ने धान्य दुकानातून निर्धारीत र केलेले कार्ड धारक अंत्योदय, बी. पी.एल., ए.पी.एल. असे संवर्ग न करुन सवलतीच्या दरात है अन्यधान्य विक्री केली जात असे.
सन २०१४ साली अन्नधान्य वितरण सुरक्षा कायदा मंजूर ने झाला असून त्यामध्ये अंत्योदय प्राधान्य कुटुंबे असे संवर्ग करण्यात आले आहे.
अन्नसुरक्षा कायदयानुसार ग्रामीण भागात ४४ हजार रुपये तर शहरी भागात ५९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित यासाठी केली आहे.
वरील बाबीचा विचार करता अनेक कुटूंबे सन १९९६ पासून सवलतीच्या दराने धान्याचा लाभघेत आहेत. दरम्यान सन २०२४ नंतर मंगळवेढा तालुक्यातील बऱ्यापैकी लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
काही कुटूंबांकडे चार चाकी वाहने आहेत. तसेच खाजगी व सरकारी मोठ्या पगाराच्या नौकरीवर आहेत.
काही शेतकरी बागायतदार असल्याचेही दिसून येत असून अशा शिधापत्रिका धारकांनी अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून धान्य सोडणे आवश्यक आहे.
धान्य सोडत नसल्याने सन २०२४ पासून नवीन इस्टांकानुसार शासनाकडे मागणी करुन अद्यापपर्यंत ते प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत लाभ देता येत नाही.
स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडून शासनास सहकार्य करावे
ज्या कुटूंबियाकडे चारचाकी वाहने तसेच दोन एकरा पेक्षा जास्त जमीन बागायत आहे. त्याचबरोबर कुटूंबातील व्यक्ती खाजगी कंपनी अथवा शासकीय नोकरीस आहे.
ज्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा सर्व कार्डधारकांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडून शासनास सहकार्य करावे. – संतोष कणसे प्रभारी तहसिलदार, मंगळवेढा
0 Comments