google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. केळी अन् टरबुजाच्या साली आहार, गुरांचा गोठा बनला राहण्याचं ठिकाण...; आई गेल्यानंतर गतिमंद मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य

Breaking News

धक्कादायक.. केळी अन् टरबुजाच्या साली आहार, गुरांचा गोठा बनला राहण्याचं ठिकाण...; आई गेल्यानंतर गतिमंद मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक.. केळी अन् टरबुजाच्या साली आहार, गुरांचा गोठा बनला राहण्याचं ठिकाण...;


आई गेल्यानंतर गतिमंद मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य

डमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. अशातच आता बीडमधील गेवराईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 

जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली आहे. शेजारील महिलेच्या जागरुकतेमुळे या मुलीची सुटका झाली असल्याचे समोर आले आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली. 

सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आली आहे. 

या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहेत. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवले होते.

गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेने या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली.

 त्यांना या मुलीची दया आल्याने त्यांनी तिची सुटका केली. तेथून तिला संभाजीनगर येथील अनाथालयात दाखल केले आहे. त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आले. 

संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने हे सर्व कार्यवाही करण्यात आली. महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची सुटका होऊ शकली आहे.

Post a Comment

0 Comments