google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे विजेचा धक्का लागून २० वर्षीय युवकाचा मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे विजेचा धक्का लागून २० वर्षीय युवकाचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे विजेचा धक्का लागून २० वर्षीय युवकाचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी विजेचा धक्का -लागल्याने २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजणेच्या सुमारास

 मेडशिंगी ता. सांगोला येथे घडली. सोनु उर्फ दिपक रावसाहेब मंडले (वय २० वर्षे, रा. मेडशिंगी ता. सांगोला) असे मृत्यूमुखी पावलेल्या युवकांचे नाव आहे.

सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनु मंडले यास राहते घरी विजेचा धक्का लागल्याने त्यास उपचारास दादासो पाटोळे यांनी ग्रामीण रुग्णालय 

सांगोला येथे उपचारास दाखल केले असता यातील सोनु मंडले हा उपच-ारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे.

 फिर्याद ग्रामीण रुग्णालय, सांगोलाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोहेकॉ बनसोडे हे करीत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments