google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बेशिस्त वागल्यास सोडणार नाही..- पोलीस निरीक्षक विनोद घुगे नूतन पोलीस निरीक्षकांची नाझरे आऊट पोस्टला भेट

Breaking News

बेशिस्त वागल्यास सोडणार नाही..- पोलीस निरीक्षक विनोद घुगे नूतन पोलीस निरीक्षकांची नाझरे आऊट पोस्टला भेट

बेशिस्त वागल्यास सोडणार नाही..-


पोलीस निरीक्षक विनोद घुगे नूतन पोलीस निरीक्षकांची नाझरे आऊट पोस्टला भेट 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे प्रतिनिधी:- गावात वाद विवाद न करता एकोप्याने राहून सुसंवाद वाढवा, गावात शिस्त ठेवा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका व प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल तयार करा

 व जर अडचण आल्यास आपण सर्व प्रश्नांची सोडवणूक करू परंतु शिस्तीचे पालन करा व गावातील भांडणे गावातच मिटवा यासाठी पक्ष पार्टी न पाहता प्रत्येकाने समंजसपणे वागा व मोबाईलचा वापर कमी करा,

 व बेशिस्त वागल्यास सोडणार नाही असा इशारा सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नाझरे आउट पोस्ट भेट प्रसंगी नागरिकांशी बैठकीत बोलताना मत व्यक्त केले. 

     आयुष्यामध्ये आपण काम करीत असताना मानव हाच एकमेव केंद्रबिंदू म्हणून काम करीत आलो तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना जात पात पाहिली नाही 

व त्यांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते व यासाठी जातीपातीचे राजकारण करू नका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले तसेच ना झरे हे गाव संतांची भूमी आहे

 त्यामुळे संतांच्या विचारावर वाटचाल करून गावाचा विकास करा तसेच प्रत्येक मुला-मुलींनी आई-वडिलांना संभाळा. सांगोला तालुका मोठा आहे व त्या मानाने पोलीस स्टाफ कमी आहे

 यासाठी सर्वांनी सहकार्य करा अडचण असल्यास फोन करा व शिस्तीचे पालन करा, अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत परंतु बेशिस्त वागू नका असा मौलिक सल्लाही पोलीस निरीक्षक घुगे यांनी यावेळी दिला. 

      सुरुवातीस पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच यावेळी बहुजन भारत संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे, पत्रकार रविराज शेटे, 

भाजपा अध्यक्ष नंदकुमार रायचुरे, युवा नेते दादासो हरिहर यांनीही मत व्यक्त केले. यावेळी सरपंच विजय सरगर, उपसरपंच सुमित्रा लोहार, वजरे सरपंच मल्लेश चव्हाण व पोलीस पाटील संघटनेतर्फे साहेबांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, सामाजिक कार्यकर्त् अप्पू राज आदाटे, शशिकांत पाटील, सुभाष कोकरे, आनंदा कोकरे, शरद गुरव, महेश वाघमारे, सोमनाथ पेशवे, रफिक काझी, अलीम काझी, अरुण सरगर, 

सर्व पोलीस पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर, पोलीस हवालदार अनिल बनसोडे, संजय भानवसे, पोलीस नाईक एस आर जाधव, नाझरे व परिसरातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments