सुबराव बंडगर सर यांच्या निधनाने अनकढाळ गावचे वैभव हरपले...-
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख अनकढाळ येथील शोकसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांची सरांना श्रद्धांजली अर्पण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नाझरे प्रतिनिधी :- स्वर्गीय आबासाहेबांनी दिलेला विचार जोपासण्याचे काम सुबराव बंडगर सर यांनी केले व या गावचे दुस रे हनुमंत बंडगर सरांचे निधन या अगोदर झाले
व आता सुबराव सरांचे निधन झाल्याने अनकढाळ गावचे खऱ्या अर्थाने वैभव हरपले असे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बंडगर यांच्या तिसऱ्या दिवसाच्या शोकसभेत श्रद्धांजली वाहताना मत व्यक्त केले.
सरांचे सुपुत्र प्रताप व विनायक भाऊ यांनी सरांची काळजी घेतली व माझ्या विजयाच्या वाट्यात सरांचा सिंहाचा वाटा होता व सरांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षाची व या भागाची
फार मोठी हानी झाली आहे. आज या गावात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व यापुढे तो सुरू राहावा असेही शोकसभेत आमदार देशमुख यांनी सांगितले.
सदर शोक सभेत विविध पक्षाचे नेते यामध्ये संभाजी आलदर, श्रीकांत दादा देशमुख, प्राध्यापक हाके, प्रफुल्ल कदम, सिद्धेश्वर झाडबुके, बबनराव जानकर, गजानन बनकर, प्राचार्य वलेकर, उल्हास दादा धायगुडे, बाळासो शिंदे,
दादासाहेब वाघमोडे, सुनील चौगुले, प्रा . वलेकर, नंदकुमार रायचुरे, शिंदे सर, डॉक्टर विजय बंडगर, अशोक पाटील, गजेंद्र कोळेकर, कॅप्टन पाटील, शेंडगे परिवार,
बालटे परिवार, प्रफुल्ल भैया कदम, इत्यादी मान्यवरांनी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रचंड जनसमुदायाने दोन मिनिटे उभे राहून मा. प्राचार्य, आबासाहेबांचे विश्वासू सहकारी,
माजी जिल्हा परिषद सदस्य, सूतगिरणीचे संचालक, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माणदेश महाविद्यालयाचे उपाध्यक्ष, सचिव, लोकनेते सुबराव बंडगर सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
0 Comments