धक्कादायक..सांगलीत आधी गुंगीचं औषध पाजलं, स्वतः दारू प्यायले,
'एमबीबीएस'च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
सांगली ः शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात 'एमबीबीएस'चे शिक्षण घेणार्या तरुणीला गुंगीचे पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार वानलेसवाडी परिसरात तिच्या मित्राच्या फ्लॅटवर मंगळवारी रात्री घडला.
याबाबत पीडित विद्यार्थिनीने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडितेसोबत शिकणार्या दोघांसह त्यांच्या मित्राला अटक केली आहे.
विनय विश्वेष पाटील (वय 22, रा. महिपती निवास, अंतरोळीकरनगर, सोलापूर),
सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय 20, रा. एफ 605, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय 21, रा. 303, कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता बेळगाव जिल्ह्यातील असून, सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात 'एमबीबीएस'चे शिक्षण घेत आहे.
पीडिता आणि संशयित पाटील, गायकवाड हे एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वानलेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणले.
तेथे तिला गुंगीकारक पेय पाजले. त्यानंतर तिघांनी तरुणीवर बलात्कार केला. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली.
मध्यरात्रीच्या सुमारास तिने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदविली.
विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments