सांगोला ब्रेकिंग..श्री विठ्ठल दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या जीपला अपघात;
१२ जण जखमी; गाडीवरील नियंत्रण सुट अन्...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पंढरपूर येथील श्री विठ्ठल दर्शनाला निघालेल्या खैरवाड (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथून जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडीतील १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात रविवारी (ता. १८) रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचेगाव (ता. सांगोला) हद्दीत घडला.
खैरवाड (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथून केए २२/झेड ५७०१ या जीपमधून विठ्ठल नारायण कोळेकर, माणिक गुंडू कोळेकर, अजूबा लक्ष्मण सागरेकर, रैमानी भैरू बस्तवाडकर, यल्लारी रुक्मण्णा गुरव, तानाजी कलाप्पा झुंजवाडकर, परसराम गुंडू नाळकर,
जोतिबा कृष्णा वाकळे, रुद्रप्पा नारायण भुजगुरव, शंकर लक्ष्मण मंडलकर, परसराम गावडू पाटील आणि कृष्णा बुधप्पा भुजगुरव असे १२ जण रत्नागिरी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले होते.
रविवारी रात्री ११ च्या सुमारास त्यांची गाडी पाचेगाव (ता. सांगोला) हद्दीत आली असता चालक अमोल चंद्रकांत पाटील (रा. आलेहोळ) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ब्रिजच्या कठड्याला जाऊन धडकली.
या अपघातात गाडीतील सर्व प्रवाशांच्या हाताला पायाला आणि डोक्याला मार लागून सर्वच प्रवासी जखमी झाले. जखमीपैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे.
त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आठ जखमीवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत गाडीतील प्रवासी कृष्णा बुधप्पा भुजगुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडीचालक चालक अमोल चंद्रकांत पाटील (रा. आलेहोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments