google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -पंढरपूर रस्त्यावर राँग साईडने येऊन एस.टी. बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

Breaking News

सांगोला -पंढरपूर रस्त्यावर राँग साईडने येऊन एस.टी. बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

सांगोला -पंढरपूर रस्त्यावर राँग साईडने येऊन एस.टी. बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी - सांगोला-पंढरपूर रस्त्यावर बेले पेट्रोल पंपासमोरील ब्रिजवर एस.टी. बसने विरुद्ध दिशेने येत मोटारसायकलला । जोरदार धडक दिल्याने मोटर सायकलस्वारचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला एक जण गंभीर

जखमी झाल्याची घटना रविवार दि.२५ रोजी घडली आहे. मंगेश भारत कांबळे (रा. पोहरगाव) या युवकाचा मृत्यू झाला असून त्याच्या पाठीमागे बसलेला दीपक भागवत गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे.

मयत व्यक्तीचा चुलत भाऊ श्रीकांत शत्रुघ्न कांबळे (रा. पो-हरगाव, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश कांबळे व दीपक गायकवाड हे स्प्लेंडर दुचाकी

 (एम.एच -१३.एम - ९६३९) वरून सांगोला येथे बाजारासाठी गेले होते. बाजार संपवून दोघे घरी परतत असताना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मांजरी गावाच्या हद्दीत 

बेले पेट्रोल पंपासमोरील ब्रिजवर लातूरहून रत्नागिरीकडे जाणारी एस.टी. बस (क्रमांक - एम.एच-०८,ए.पी - ६१६०) ही राँग साईडने येत जोरात धडकली. 

या अपघातात मंगेश कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर सांगोला येथील खा-जगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर मृताच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी. बस चालक बालाजी वैजिनाथ मडुळे (वय ३८, रा. रत्नागिरी डेपो) याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे १ लाख रुपयांचे वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments