google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांची कामगिरी पोलीस निरीक्षक विनोंद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली मौजे मेडशिंगी ता. सांगोला येथील जुगार आड्यावर छापा टाकुन १८१५७०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

Breaking News

सांगोला पोलीसांची कामगिरी पोलीस निरीक्षक विनोंद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली मौजे मेडशिंगी ता. सांगोला येथील जुगार आड्यावर छापा टाकुन १८१५७०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

सांगोला पोलीसांची कामगिरी पोलीस निरीक्षक विनोंद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली मौजे मेडशिंगी


ता. सांगोला येथील जुगार आड्यावर छापा टाकुन १८१५७०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- दि.१२/०५/२०२५ रोजी सपोनि सचिन जगताप यांना गोपणीय बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, मौजे मेडशिंगी गावचे हद्दीत आश्रमशाळेजवळ असणा-या अक्षय पवार याचे शेतात लिंबाचे झाडाखाली 

काही इसम हे जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ सपोनि सचिन एस जगताप, पोहवा/१५४७ वजाळे, पोना /६८ माळी, 

पोहेकॉ/१४१३ काझी, पोकों/१७८ पांढरे, पोकों १८११ गणेश कुलकर्णी असे खाजगी वाहनांने पंचासह मौजे मेडशिंगी गावातील अक्षय पवार यांचे शेतामध्ये पोहचलो सदर ठिकाणी कांही इसम गोलाकार बसलेले दिसले.

 त्यांचा पोलीसांना जुगार खेळत असल्याबाबत संशय आल्याने त्यांना जागीच गराडा घालुन १७/३० वाजता पकडले. त्यावेळी त्यांचे समोर मधोमध पत्याची पाने व रोख रक्कम 

तसेच हातामध्ये काही पत्याची पाने घेवुन ते रमी नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसुन आल्याने जुगार खेळत असताना पकडलेल्या इसमांकडे पंचासमक्ष त्यांची नावे व पत्याबाबत विचारपूस करता त्यांची नावे 

१) राजेंद्र अशोक कोकरे वय ३१ रा सांगोला जि सोलापर, ०२) अख्तर मुसा मणेरी वय ५१ रा सांगोला, ०३) सागर शंकर गायकवाड वय ३२ रा वासुद ता सांगोला, ०४) अक्षय अगर पदार वय २८ रा मेडशिंगी ता सांगोला, 

५) सिराज ईस्माईल मुजावर वय ४६ रा शेगाव जत जि सांगली ६) प्रशांत बबन घनवजीर वय ३७ वर्षे रा. मिमनगर सांगोला ७) विठ्ठल धर्मराज केदार वय ४२ वर्षे रा. वासुद ता. सांगोला अशी असल्याचे सांगितले.

 पकडलेल्या इसमांकडे सदर जुगार आड्डा मालकाबाबत विचारपूस चौकशी करता त्यांनी जुगार अड्डा मालक आरोपी क्र. ०२ अख्तर मुसा मणेरी वय ५१ रा सांगोला, है असल्याचे सांगितले. 

आम्ही पंचासमक्ष जुगार खेळताना मिळुन आलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता आरोपी क्र. ०१ ते ०७ यांच्या ताब्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आले आहे.

१८१५७०/- रोख रक्कम व जुगाराचे साहित्य

१८१५७०/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांचे ताब्यात मिळाला असुन तो सपोनि जगताप यांनी पंचास्त्मक्ष ताब्यात घेवुन जागीच जप्त केलेला असुन महाराष्ट्र जुगार पत्तिबंधक अधिनीयम कलम १२अ प्रमाणे पो.कॉ. १८११ गणेश कुलकर्णी यांनी सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केलेली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री प्रितम यावलकर सो, अपर पोलीस अधिक्षक सो. सोलापुर ग्रामीण मा. श्री विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे

 सांगोला पोलीस ठाणे यांचे आदेशान्वंये सपोनि सचिन जगताप पोहकों दत्ता वजाळे, पोना सुरेश माळी, पोहेकों अस्मल काझी, पोकों मारुती पांढरे, पोकों गणेश कुलकर्णी यांनी सदरची कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments