हे काम स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना या योजनेचे काम
प्रगतीपथावर तानाजीराव भोसले - शिवसेना तालुका उपप्रमुख सांगोला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
खरंतर ही जुनी योजना होती परंतु गेली 25 वर्ष या योजनेचा कोणताही पाठपुरावा झाला नाही त्यामुळे ही योजना शासन दरबारी बंद झाली होती
परंतु आमदार शहाजी बापू पाटील यांचे मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होते त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बापूंना भेटण्यासाठी गेले होते
त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बापूंना काही काळजी करू नका तुम्हाला तुमच्या तालुक्यासाठी काय पाहिजे ते सांगा असं विचारल्यानंतर बापूंच्या डोळ्यात पाणी आले व मला वैयक्तिक काहीही नको
माझ्या तालुक्यासाठी बंद पडलेली उजनी उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करा अशी मागणी घातली व तत्पर मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली व कालांतराने लगेचच या योजनेसाठी 954 कोटी मंजूर केले
आता या योजनेचे काम प्रगतीपथावर असून या योजनेमध्ये सांगोला तालुक्यातील दुष्काळी सोळा गावांसाठी 54 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व दोन वर्षांमध्ये ही योजना पूर्ण होणार आहे वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं
सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी व एवढे मोठे काम कधीच झाले नव्हते तरीसुद्धा तालुक्यातील जनतेने या कामाची कदर केली नाही जनतेने असा कौल का दिला अजूनही न उलगडणारे कोडे आहे
अशा अनेक विकासाच्या योजणा राबविण्यासाठी आमदार म्हणून बापु तुम्हीच पाहिजे होता --
[ तानाजीराव भोसले - शिवसेना तालुका उपप्रमुख सांगोला ]
0 Comments