google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं;

Breaking News

मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं;

मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; 


मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील बिरुदेव मंदिराच्या परिसरात एका ३५ वर्षीय जावईबापूने अज्ञात कारणावरुन लिंबाच्या झाडाला गळफास दोरीच्या सहाय्याने घेण्याचा प्रकार घडला असून

अमितकुमार महादेव चौगुले असे त्या आत्महत्या ने करणाऱ्या जावईबापूचे नाव आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी, यातील खबर देणारे रामा शिंदे (रा. पडोळकरवाडी) यांची मुलगी सुनिता अमितकुमार चौगुले (रा.हुन्नूर) ही आजारी असल्याने औषधोपचाराकरिता आई वडिलाकडेच आली होती.

दि.१२ मे रोजी सकाळी ७.३० वाजता खबर देणारे घरी असताना भैरु भोसले यांनी फोन करुन सांगितले की तुमचा जावई अमितकुमार चौगुले यांनी बिरुदेव मंदिराच्या गेटच्या आतील बाजूस लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे.

असे सांगितल्यावर खबर देणारे त्यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता जावयांनी दोरीने फास घेतल्याचे दिसून आले.

याची पोलीसांना खबर दिल्यानंतर पोलीसांनी व तेथील लोकांनी सदरचे प्रेत खाली उतरवुन तपासणीसाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घेवून आले व डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments