ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलीसांची कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली
बाळु वाहतुक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई करुन ८.२४०००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:-दि.११/०५/२०२५ व दि.१२/०५/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना गोपणीय बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, मौजे आलेगाव हद्दीतील
कोरडा नदीपात्रातुन तसेय मौजे महुद येथील सरकारी विहीरीच्या बाजुला असणाऱ्या कासार ओढा मधील बंधाऱ्यातुन अवैध्य रित्या वाळु वाहतुक चालु आहे,
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सांगोला पोलीस ठाणेकडील पथकाने मौजे आलेगाव व मौजे महुद येथे छापा टाकुन १) करण शामराव जाधव रा. टकले वस्ती ता. सांगोला
हा पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या एन्ट्रा वाहनातून व २) सुरज रामहरी धोत्रे रा. चिकमहुद ता. सांगोला हे एमएच १० बीआर ४१२७ या वाहतुन तसेच ३) एमएच १३ एएन ७६१९ या वाहनाचा अज्ञात
चालक यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता, विना परवाना अवैध्य वाळु वाहतुक करीत असताना मिळाल्याने सदरची वाहने व अवैध्य चाकु जप्त करण्यात आलेली आहे.
८.२४०००/- अवैध्य वाळु वाहतुक करणारी ३ वाहने व ३ ब्रास वाळु
८.२४०००/- रुपयाची वाहने व अवेध्य वाळु ताब्या घेवुन सांगोला पोलीस ठाणे अवारात आणुन लावुन मा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण संरक्षण
अधिनीयम कलम ९. १५ अन्वये पोकों सदाम नदाफ व पोकों मारुती पांढरे यांनी कायदेशीर फिर्याद देवून गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री प्रितम यावलकर सी, अपर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण
मा. श्री विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांचे
आदेशान्वये पोसई हणमंत हिप्परकर, पोहेकों अस्मल काझी, पोहकों दत्ता वजाळे, पोकों संजय कांबळे, पोकों मारुती पांढरे, पौकों गणेश कुलकर्णी यांनी सदरची कारवाई केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
0 Comments