google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तब्बल १८ वर्षांनंतर कोळे विद्यामंदिर येथे गेट टू गेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

Breaking News

तब्बल १८ वर्षांनंतर कोळे विद्यामंदिर येथे गेट टू गेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

तब्बल १८ वर्षांनंतर कोळे विद्यामंदिर येथे गेट टू गेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न..!


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कोळे प्रतिनिधी :- सांगोला तालुक्यातील कोळे विद्यामंदिर या ठिकाणी प्रशालेच्या सन २००६-०७ बॅच चे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच शेक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थित

 माजी विद्यार्थी यांचा १३ मे २०२५ रोजी हा भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.दीप प्रज्वलित करून या स्नेहमेळावा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोळे विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक लांडगे (सर) उपस्थित होते व सहशिक्षक शेख सर,के.पि.आलदर सर. गढहीरे सर,सर्व शिक्षकांचा सत्कार हा प्रशालेच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे हस्ते करण्यात आला.

          सन २००६-०७ एस.एस.सी  बॅच चे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा हा तब्बल १८ वर्षानंतर झाला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. तब्बल १८ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी एकमेकांना भेटून खूप आनंद झाला.

आणि हा गेट टुगेदर अविस्मरणीय असाच झाला.या वेळी उपस्थित शिक्षक यांनी माजी विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्नेहमेळाव्याचा कार्यक्रमाचा शेवट हा जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments