खळबळजनक..सांगोला पोलीसांची कामगिरी सांगोला पोलीस ठाणेकडील
डी. बी. पथकाने अवैध्य दारु वाहतुक करणाऱ्या वाहनासह ६.२२.७५४ /- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- दि.३०/०४/२०२५ रोजी मा. विनोंद घुगे, पोलीस निरीक्षक सो, सांगोला पोलीस ठाणे यांनी श्रेणी पोसई हणमंत हिप्परकर, पौकॉ/२२०६ धुळदेव चोरमुले, पौकों ८६० सद्दाम नदाफ यांना त्यांचे कार्यालयात बोलावून घेवून कळविले की, सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील
सांगोला शहरातून अवैध दारूची विक्री करण्याकरीता वाहतूक केली जात असल्याबाबत बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली आहे. तरी आपण सर्वजण वरील ठिकाणी जावून बातमीची खातरजमा करून कारवाई करावयची आहे.
म्हणून लागलीच सर्व पोलीस अंमलदार एका खाजगी वाहनाने, दोन पंचाना बोलावून वरील मजकूराचा आशय त्यांना समजावून सांगितला. त्यानंतर वरील पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने
सांगोला शहरालगत असलेल्या पंढरपूर ते सांगोला रोडवरील नॅशनल हाथवे क्र. १६६ च्या ब्रिजखाली रोडच्या बाजूला आमचे वाहन लावून थांबले काही वेळाने त्याठिकाणी एक पांढ-या रंगाची बोलेरो जीप गाडी आली
त्यावेळी त्यांना प्रोव्ही गुन्ह्याचा माल असल्याचा संशय असल्याने त्या वाहनास त्यांनी हात करून थांबविले व त्यातील चालकाला गाडीच्या खाली उतरावून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव
१) प्रकाश चुडाप्पा शिंदे वय ४३ वर्षे रा. मेडसिंगी ता. सांगोला जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यावर पोलीसांनी गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता प्रकाश शिंदे यांनी गाडीमध्ये दारु असल्याचे सांगीतले. सदरचा माल हा
२) शरद मारुती मस्के रा. कचेरी मेनरोड सांगोला यांचा असल्याचे सांगीतले. त्यानंतर पोलीसांनी आरोपी, वाहन तसेच सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला त्या प्रोव्हीबीशन मालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) १,७२,७५४/- देशी विदेशी कंपनीची अवैध्य दारुचे बॉक्स
२) ४,५०,०००/- एक पांढ-या रंगाची बोलेरो जीप त्याचा आरटीओ नंबर
६.२२.७५४/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांचे ताब्यात मिळाला असुन ती श्रेणी पौसई हिप्परकर यांनी पंचासमक्ष ताब्यात घेवुन जागीच जप्त केलेला असून
सांगोला पोलीस ठाणे मु.नं.२.३३६/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम कलम ६५ई, ६५फ प्रमाणे पी.कॉ. ८६० सदाम रसुल नदाफ यांनी सरकार तर्फे कायदेशीर फियांद दाखल केलेली आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री प्रितम यावलकर सो, अपर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण मा.श्री विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा,
यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे, श्रेणी पोसई हणमंत हिप्परकर, पोका सद्दाम नदाफ, पोका धुळदेव चोरमुले यांनी सदरची कारवाई केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोसई हिप्परकर करीत आहेत.
0 Comments