ब्रेकिंग न्यूज..अवैद्य दारू अड्ड्यावर छापा सांगोला पोलिसांची मोठी कारवाई 2 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/ प्रतिनिधी पोलीस निरीक्षक विनोंद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली भाळेवाडी ता. सांगोला येथील अवैध्य दारु आड्यावर छापा टाकुन केला
२.५८.७२०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. दि.३०/०४/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांनी
श्रेणी पोसई हिप्परकर, पोकॉ धुळदेव चोरमुले, पोकों सद्दाम नदाफ यांना त्यांचे कार्यालयात बोलावून घेवून कळविले की, सांगोला पोलीस ठाणे हददीतील नाझरा शिवारात
भाळेवाडी येथे एक इसम पत्रा शेडमध्ये अवैध दारूची विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे. तरी आपण सर्वजण वरील ठिकाणी जावून बातमीची खातरजमा करून कारवाई करावयची आहे.
असे सांगितल्याने वरील सर्व पोलीस अंमलदार एका खाजगी वाहनाने पंचाना सोबत घेवुन बातमीचा आशय त्यांना समजावुन सांगुन नाझरा शिवारातील भाळेवाडी येथे जावुन रोडच्या बाजुला वाहने लावुन थांबलो.
सदर ठिकाणी पत्राशेडच्या समोर एक इसम उभा असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले तेव्हा पोलीसांनी त्याचा संशय आल्याने त्यास जागीच गराडा घालुन पकडले व त्यास नाव गाव विचारले
असता त्यांना आपले नाव सतिश सदाशिव आदट वय ४३ वर्षे रा-नाझरा ता. सांगोला असे असल्याचे सांगितले त्यावेळी पोलीसांनी पत्राशेडची झडती घेतली असता खालील अवैध्य प्रोव्हीबिशन माल मिळुन आलेला आहे.
1) 2,58,720/- देशी विदेशी कंपनीचे ७७ बॉक्स अवैध्य दारु 2,58,720/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांचे ताब्यात मिळाला असुन तो श्रेणी पोसई हिप्परकर यांनी पंचासमक्ष ताब्यात घेवुन
जागीच जप्त केलेला असुन सांगोला पोलीस ठाणे गु.नं.र.३४३/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम कलम ६५ई प्रमाणे पो.कॉ. ८६० सदाम रसुल नदाफ यांनी सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केलेली आहे.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर सो, अपर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा,
यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे, श्रेणी पोसई हणमंत हिप्परकर, पोकों सद्दाम नदाफ, पोकों धुळदेव चोरमुले यांनी सदरची कारवाई केली आहे.
0 Comments