भयंकर..कौटुंबिक भांडणाचा राग डोक्यात शिरला; हैवान बापाने स्वतःच्याच पोराचा गळा आवळला
नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याची घटना घडलीय. कौटुंबिक वादामुळे हैवान बनत एका व्यक्तीनं स्वतःच्याच नऊ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना
आज नाशिकमध्ये घडलीय.भांडणाचा राग डोक्यात गेल्यानंतर दारूच्या नशेत एका व्यक्तीनं आपल्या मुलाचा गळा आवळला.
ही घटना नाशिकच्या उपगनगर भागातील आम्रपाली परिसरात घडली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत घटनेचा सखोल तपास केलाय.
सुमित पुजारी असं आरोपी वडिलांचं नाव आहे. सुमित पुजारीने दारुच्या नशेत आपल्या ९ वर्षाच्या मुलाची हत्या केलीय.
बायको नांदायला येईना, जावयानं सासऱ्याचा जीव घेतला
कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेहुण्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात घडलीय.
याप्रकरणी आरोपी जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सासरमधील तिघांवर चाकू हल्ला केल्यानंतर जावई फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अडीच वर्षांपासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही. तसेच कोर्टात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर प्रचंड संतापले होते.
याच रागातून त्याने २७ एप्रिल रोजी रात्रीच्यावेळी सासू, सासरे आणि मेहुण्यावर चाकू हल्ला केला.
0 Comments