खळबळजनक घटना...मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग;
जतच्या नामांकित आश्रमशाळेतील प्रकार, मुख्याध्यापकाला अटक
'त्या' मुख्याध्यापकावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल; अल्पवायीन मुलीला केबिनमध्ये बोलावून घ्यायचा अन्..
जत : जत तालुक्यातील आश्रम शाळेतील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी 'त्या' मुख्याध्यपकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
विनोद परसू जगधने (वय ५०, नराळ, ता.सांगोला, जि. सोलापूर ) असे गुन्हा झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. याबाबत पीडित अल्पवायीन मुलीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी जत पूर्व भागातील एका आश्रम शाळेतील संशयित मुख्याध्यापक विनोद जगधने याने पीडित अल्पवायीन मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेऊन अश्लील प्रकार केल्याचे समोर आले आहे.
याबाबत समाजकल्याण व महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर केला आहे.
यावरून पोलिसांनी संबंधित मुलगी व नातेवाईकांना बोलावून याबाबत जाबजबाब नोंदवून संशयित आरोपी जगधने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापक विनोद जगधने याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला
असून त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे हे करत आहेत.
0 Comments