सांगोला महावितरण कंपनीकडून पुरेशा दबावाने वीज पुरवठा करावा :
वीज ग्राहकांची मागणी महावितरणाच्या गलथान कारभारामुळे नागरिक वस्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात कमी दाबाने होत असलेल्या वीज पुवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले, महिला, वयोवृद्ध लोक, नागरिक यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा ४२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. विजेच्या कमी दाबाच्या वितरणामुळे नागरिकांना उष्णता व उकड्याने हैराण करून सोडले आहे.
सांगोला शहरातील काही ठिकाणी कमी दाबाच्या वीज वितरणेमुळे घरातील पंखेही हाताने फिरवावे लागत आहेत कमी दाबावाच्या या विजेच्या वितरणामुळे इलेक्ट्रिक वस्तूत बिघाड होत आहे
पॅन, टीव्ही, मिक्सर, फ्रिज, वाशिंग मशीन यांसारख्या वस्तुत बिघाड होत आहे. याचा नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
वाळ्या तापमानाच्या त्रासामुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होऊ लागली आहे.
त्यात कमी दाबाच्या या वीज पुवठ्यामुळे घरातील वयोवृद्ध व -लहान मुलांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी वीज पुवठा पुरेशा दाबाने करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 Comments