google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भोपसेवाडी येथील गुरववस्ती पाझर तलावाचे काम तत्काळ रद्द करावे ; भोपसेवाडी येथील शेतकऱ्यांची जलसंधारण मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

Breaking News

भोपसेवाडी येथील गुरववस्ती पाझर तलावाचे काम तत्काळ रद्द करावे ; भोपसेवाडी येथील शेतकऱ्यांची जलसंधारण मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

भोपसेवाडी येथील गुरववस्ती पाझर तलावाचे काम तत्काळ रद्द करावे ;


भोपसेवाडी येथील शेतकऱ्यांची जलसंधारण मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल  

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी भोपसेवाडी ता सांगोला येथे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पाझर तलावाचे

 रुपांतरीत साठवण तलाव करण्याचा घाट घातला आहे. गुरववस्ती येथील पाझर तलाव क्र ८ चे हे काम बेकायदेशीर आणि शेतकऱ्यांना त्रासदायक

 असल्याने सदरचे काम तत्काळ रद्द करण्यात यावे म्हणून भोपसेवाडी येथील शेतकऱ्यांनी थेट राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे.

भोपसेवाडी येथील गुरववस्ती येथे १९७२ च्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळावे आणि या परिसरातील विहिरी बोअरवेल आणि अन्य जलस्रोत यांना पाणी उपलब्ध व्हावे

 या उद्देशाने पाझर तलाव करण्यात आला होता. या तलावातील पाणी पाझरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होत होता. या परिसरातील विहिरी, बोअर

 आणि अन्य जलस्रोत यांना पाणी आल्याने या परिसरातील शेतकरी समाधानी होता. मात्र सांगोला तालुक्यातील काही ठेकेदारांनी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांना 

हाताशी धरून खोटी कागदपत्रे सादर करून, बोगस पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सदर करून आणि सदर कामाचे खोटे अंदाजपत्र तयार करून हे काम करण्याचा घाट घातला आहे.

 विशेष म्हणजे काम मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. किंवा त्यांच्याकडून या कामाबाबत कोणतीही संमती घेतली नाही. 

जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांना राजकीय दबाव असल्याने आणि त्यांनी ठेकेदारांशी आर्थिक वाटाघाटी केल्याने भोपसेवाडी येथील पाझर तलावाचे कोणतेही कारण किंवा गरज नसताना साठवण तलाव करण्याचे काम सुरू करण्याचा ठेकेदार प्रयत्न करत आहेत.

 हे काम तत्काळ बंद करावे अशी मागणी या परिसरातील शेतकरी अंकुश गावडे, आप्पा गावडे आदींसह शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि तहसीलदार

 सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे हे काम रद्द न केल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात उपोषणाचा इशाराही या निवेदनातून शेतकऱ्यांनी दिला आहे.

चौकट ; 

अन्यथा गंभीर परिणाम होतील....!

भोपसेवाडी येथील गुरववस्ती पाझर तलावाचे काम करण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. ठेकेदार प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी जर बळाचा वापर करून दंडेलशाहीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम करण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ घडेल. होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन, प्रशासन आणि नेतेमंडळी याला जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

अंकुश गावडे,

माजी सैनिक, भोपसेवाडी.

Post a Comment

0 Comments