धक्कादायक.. वडिलांनी मारहाण केल्याने शाळकरी मुलीने जीवन संपवले
सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सोलापूर : वडिलांनी केलेल्या मारहाणीसह शिवीगाळीमुळे सातवीत शिकणार्या बारा वर्षीय मुलीने गळफास घेत जीवन संपवले.
ही घटना शुक्रवारी (दि. 25) घडली. प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.मृत प्रियदर्शनी ही विद्यानिकेतन शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती.
तिला तिच्या वडिलांनी वारंवार मारहाण केली. ते तिला सतत शिवीगाळ करत असत, असा आरोप प्रियदर्शनीच्या आईने केला मीडियाशी बोलताना केला.
वडील सतत मारहाण करीत असल्याने ती तिच्या आजीच्या घरी राहण्यास गेली होती. तेव्हा प्रियदर्शनीला वडिलांनी फोन केला. 'तू आताच्या आता घरी ये, नाही तर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन', अशी धमकी त्यांनी दिली.
यामुळे प्रियदर्शनी घाबरली आणि ती घरी आली. त्यानंतर वडिलांनी तिला मारहाण केली व ते घरातून निघून गेले.
त्यानंतर तिची आई पण मार्केटला गेली. तेव्हा प्रियदर्शनीने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिची आई अनुराधा शिंगे यांनी सांगितले.
प्रियदर्शनीच्या आईने केलेले आरोप खरे आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत सदर बझार पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments