भयावह! घरात रक्ताचा सडा, धारदार शस्त्राने कापला स्वत:चा
गळा, तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने सोलापुरात खळबळ
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणखी एका धक्कादायक घटनेची नोंद सोलापुरात झाली आहे. अलीकडेच प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची घटना
ताजी असतानाच आता सोलापुरात नवख्या डॉक्टर आदित्य नमबियार यांनी स्वतःचा गळा कापून आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे
आदित्य नमबियार (Aditya Nambiar) यांनी नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सोलापुरात शिकाऊ डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. याच राहत्या घरी त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आदित्यने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
डॉ. वळसंगकर प्रकरणानंतर अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात घडलेल्या या दुसऱ्या धक्कादायक घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात आणि राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
0 Comments