google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..'जगण्याचा कंटाळा आला' अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या; घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको

Breaking News

धक्कादायक प्रकार..'जगण्याचा कंटाळा आला' अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या; घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको

धक्कादायक प्रकार..'जगण्याचा कंटाळा आला' अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या;


घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मला जगण्याचा कंटाळा आला आहे’, अशी चिठ्ठी लिहून सतरा वर्षाच्या स्नेहा सौदागर गायकवाड (रा. तरडगाव, ता. मोहोळ) या मुलीने दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

 ही घटना मंगळवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी हॉस्टेल गाठत तेथील प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले.

मृत स्नेहा गायकवाड ही दयानंद कॉलेजमध्ये अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. ती काही दिवसांपूर्वी गावी गेली होती. तिला तिच्या पालकांनी मंगळवारी सकाळीच हॉस्टेलमध्ये आणून सोडले.

दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिने रूममध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेतला. आपल्या मुलीला लटकलेल्या अवस्थेत पाहून आईवडिलांनी टाहो फोडला.

शिवाय, या घटनेला जबाबदार असणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी कारवाई करण्याचे अश्वासन दिल्याने नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.

सायन्सला मिळाले ६२ टक्के

स्नेहा ही मंगळवारीच हॉस्टेलवर आली होती. सकाळी अकरावीचा विज्ञान शाखेचा निकाल घोषित करण्यात आला. यात तिला ६२ टक्के गुण मिळाले, या आनंदातून तिने आपल्या भावाला,

पित्याला फोन करून ही माहिती दिली अन् सायंकाळी तिचा मृतदेह पहायला मिळाला असे वाटले नव्हते म्हणत तिच्या आईवडील छाती बडवून घेत होते.

Post a Comment

0 Comments