google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवजात बालकावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार

Breaking News

नवजात बालकावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार

नवजात बालकावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ येथील नवजात बालकाचे जन्मानंतर वजन कमी असल्याने व त्याला श्वसनास त्रास होत असल्याने पालकांनी सांगोला येथील आलदर हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.

 बालकाला लगेच काचेची पेटीमध्ये(NICU) विभागात कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटिलेटर ) देवून उपचार सुरू करण्यात आले.

दहा दिवसांनी आज बालकाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून बालकांचे सर्व उपचार मोफत करण्यात आले.

डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला. 

नातेवाईकांना औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.

तरी सर्व गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments