खळबळजनक...सांगोला, पंढरपूर मंगळवेढ्यात भूकंपाचे धक्के; सांगोला केंद्रबिंदू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे.
सांगोला तालुक्यात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केले आहे.
हा भूकंप २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता आणि याचे सौम्य परिणाम सुमारे पाच किलोमीटर परिसरात जाणवले.
आज सकाळी साधारणपणे ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले. याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने अधिकृत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत एक ट्विट केले आहे आणि भुकंपासंदर्भात थोडेसे वृत्त दिले आहे.
सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरलली आहे.
सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात याआधी मोठ्या प्रमाणात भूकंपाची नोंद नसली तरी सांगोला परिसरात हे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते, त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवली जात होती.
0 Comments