शहाजीबापू पाटील यांनी घेतली जलसंपदा मंत्री ना. विखे-पाटील
यांची भेट मंत्रीमहोदयांनी टेंभू उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याविना जनावरांचा चारा टिकविणे मुश्किल झाले आहे.
येत्या काही दिवसात पाण्याची भीषण टंचाई भासणार आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी माण नदी पात्रात तत्काळ सोडून सांगोला तालुक्यातील बलवडी ते मथवडे पर्यंतचे बंधारे भरून द्यावे
अशी मागणी करीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्रीमहोदयांनी टेंभू उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मंगळवार, १ एप्रिल रोजी मुंबई येथे टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंत सर्व बंधारे भरून देणे संदर्भात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी माजी आमदार अॅड.
शहाजीबापू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यावर शहाजीबापूंनी लागलीच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी त्यांनी तालुक्याच्या शेती पाण्याची असलेली भीषण अवस्था सांगितली. यावर ना. विखे पाटील यांनी तत्काळ संबंधित टेंभू उपसा सिंचन विभागास कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी माजी सरपंच जगदीश पाटील, अभिजीत नलवडे, राहुल घोंगडे, शहाजी दिघे, दीपक दिघे व माण नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.
0 Comments