google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...भरसभेत शहाजीबापूंनी स्टेजवर स्वत:च्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या; म्हणाले.

Breaking News

खळबळजनक...भरसभेत शहाजीबापूंनी स्टेजवर स्वत:च्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या; म्हणाले.

खळबळजनक...भरसभेत शहाजीबापूंनी स्टेजवर स्वत:च्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या; म्हणाले.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. 

यावेळी शहाजीबापू पाटील यांच्या निशाण्यावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील होते.तसेच, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पराभवाबद्दल शहाजीबापू पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. 

'ज्यांनी पाणी अडवले, त्यांना खासदार केले आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे. हाणून-हाणून घ्यावसं वाटतेय,' असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी स्वत:च्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या.

जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार सांगोल्यात आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

..अन् उजनीचे पाणी सांगोल्याला मिळाले

शहाजीबापू पाटील म्हणाले, "जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे दोघे नसते, तर सांगोल्याला पाणी मिळू शकले नसते. 

मंत्रालयातील बैठकीत अधिकारी 'रक्कम वाढते,' असे सांगत असताना जयकुमार गोरेंनी अधिकाऱ्याला 'एकदा मंजूर झाले होतो ना… 

मग देऊन टाकायचे,' असे खडसावले. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुढे होऊन सर्वांच्या सह्या आणल्या आणि उजनीचे पाणी सांगोल्याला मिळाले."

गोरेंमुळे राजेवाडी धरणाचे काम झाले

"नीरा देवघर धरणातून एक टीएमसी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा नीरा डावा आणि उजवा कालवा बारमाही करण्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. 'राजेवाडीचे धरण भरले पाहिजे,' असे धोरण जयकुमार गोरे यांनी आणले.

 राजेवाडीसाठी मी पाणी मागितले होते. मात्र, माझी ताकद कमी पडतेय, हे माझ्या लक्षात आले होते. पण, गोरे यांनी रेटा लावला आणि आपले राजेवाडी धरणाचे काम झाले," असे पाटील यांनी सांगितले.

जयाभाऊ सांगेल त्याच चिन्हाला मते द्यायची

"आरडून-ओरडून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्ता लागते, हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसाने सांगितले आहे. आता जयाभाऊंचा सत्कार घेतला. घेतला की नाही?

 मग उद्या वाकडे चालायचे नाही. जयाभाऊ सांगेल, त्याच ठिकाणी, त्याच चिन्हाला मते द्यायची. तुम्हाला आईची शपथ आहे. ज्यांनी पाणी अडवले आहे,

 त्यांना खासदार केले आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे. हाणून-हाणून घ्यावसे वाटतेय," अशी खंत व्यक्त करत शहाजीबापू पाटील यांनी स्वत:च्या थोबाडीत दोन चापटा हाणून घेतल्या.

'पाणी अडवले' म्हणून शहाजीबापूंनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना लक्ष्य केले आहे. तर, 'घरात बसून आहे,' म्हणत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments