ब्रेकिंग न्यूज..पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस सिलेंडरही 'एवढ्या' रुपयांनी वाढला;
सर्वसामान्यांच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक सुरुच
सेन्सेक्सची घसरण आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर 550 रुपयांवर गेला आहे.
तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.
आधीच वाढणारी महागाई, त्यात सिलेंडरही महाग झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे.
एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.
आजपासून दरवाढ लागू
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. ही वाढ उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या सर्व ग्राहकांना लागू होईल.
ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन मिळावे म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. नवीन किमतींनुसार उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
गॅसच्या किमती वाढतच जाणार?
इंधनाचे दर हे सरकारच्या नियंत्रणात नाहीत. त्यामुळे गॅस दराचा दर 15 ते 30 दिवसात आढावा घेतला जाऊ शकतो. तसेच पेट्रोल आणि डिझेल दराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जो ट्रेंड सुरू आहे
तो कायम राहिला तर त्याचाही आढावा घेतला जाऊ शकतो असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर यापुढे गॅस दराच्या किमती सातत्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments